छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण १०२७ सेवा सध्या नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. मात्र, या सेवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १५ ऑगस्टपासून ‘आपले सरकार 2.0’ या नव्या पोर्टलच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी दिली.

मंगळवारी (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील सेवा केंद्र चालकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, प्रकल्प संचालक शरद दिवेकर हे उपस्थित होते.

काटकर यांनी सांगितले की, १३८ सेवा ३१ मेपर्यंत एकत्रित करण्याचे लक्ष्य असून, त्यापैकी ९२ सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. उर्वरित ३०६ ऑफलाईन सेवा देखील ऑनलाईन करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे.

नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट द्वारे देखील माहिती व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यात १०९४ सेवा केंद्र असून, येथे सेवा दर प्रदर्शित करणे, QR कोडवर तक्रार नोंदविणे, भुस्थिर सेवा देणे यासारख्या सुधारणा करण्यात येत आहेत. जिथे कामाचा भार अधिक आहे, तेथे अधिक लॉगिन आयडी देण्याचा विचारही सुरू आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार असून, वेळ व श्रम वाचून शासनाच्या डिजिटल परिवर्तनाला चालना मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

771 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क