छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी एक अनोखा आणि विनोदी पद्धतीने समाजातील पुरुषांनी आपला आवाज उठवत ‘पिंपळपौर्णिमा’ साजरी केली. शहरातील शिर्डी रोड परिसरात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि पत्नीपीडित पुरुषांच्या आश्रमाच्या वतीने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

परंपरेनुसार वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात आणि सात जन्मांसाठी तोच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतात. मात्र, या परंपरेला टोमणा मारत पत्नीपीडित पुरुषांनी यावर्षी ‘सात जन्म काय, सात सेकंदही अशी बायको नको’ अशा घोषणा देत पिंपळाच्या झाडाभोवती उलट्या १०८ प्रदक्षिणा घालून आपल्या वेदना व्यक्त केल्या.

या अनोख्या ‘पिंपळपौर्णिमा’ उत्सवात सहभागी झालेल्या पुरुषांनी कावळ्याचेही पूजन केले. कारण भारतीय परंपरेत कावळा पूर्वजांचा प्रतीक मानला जातो. “कावळ्यासमोर निदान आपल्या भावना मोकळ्या करता येतात, समाजात पुरुषांनी व्यथा बोलल्या तर त्यांची थट्टा होते,” असे एका सहभागी पुरुषाने सांगितले.

पत्नीपीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक म्हणाले, “आज समाजात केवळ स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलले जाते. मात्र, काही पुरुष मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करत असून त्यांच्यासाठी कोणताही व्यासपीठ नाही. ही ‘पिंपळपौर्णिमा’ म्हणजे आमच्या वेदनांची शांत पण सशक्त अभिव्यक्ती आहे.”

या अनोख्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये एकच खसखस झाली असून, काहींनी याला विनोदी तर काहींनी सामाजिक वास्तव ठरवले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,133 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क