छत्रपती संभाजीनगर : जून महिना उजाडल्यावर सर्वत्र पावसाची चाहूल लागते, पेरणीसाठी लगबग सुरू होते, आणि उकाड्यापासून सुटका होते, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. मात्र यंदा या अपेक्षांवर पाणी फिरले असून, ७ जून उलटूनही पावसाचा मागमूस नाही. उलट तापमानात सातत्याने वाढ होत असून, शहरात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, आणि शेतकरीही चिंतेत आहेत.
मे महिन्यात काहीसा बेमोसमी पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु त्याच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी मान्सून लवकर येईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट दिसते आहे.
सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत असून, पुन्हा एकदा उकाड्याने नागरिकांची दमछाक सुरू झाली आहे. शहरात पंखे, एसी, कुलर लावल्याशिवाय राहता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची प्रतीक्षा नागरिकांसह शेतकरी वर्गालाही लागून राहिली आहे.
शेतीसाठी आवश्यक असलेल्या पावसाअभावी पेरणीची कामे रखडली असून, जमिनी ओलसर होण्यासाठी शेतकऱ्यांना आता पावसाच्या पहिल्या सरींची वाट पाहावी लागत आहे. सध्या ‘मधेच पाऊस आणि मधेच उकाडा’ अशी विचित्र हवामानाची स्थिती असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*