छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपासून जुन्या व भंगार बसेसच्या तक्रारी करत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळाला असून, विभागाला एकूण ४५ नवीन ‘लालपरी’ (एसटी बसेस) प्राप्त झाल्या आहेत. यामुळे वाहतुकीची व्यवस्था अधिक सुटसुटीत झाली असून, प्रवाशांच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या एकूण ५५२ एसटी बस आहेत. यामध्ये मोठ्या कालावधीनंतर नव्या बसेस येण्यास सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील सात आगारांना टप्प्याटप्प्याने या बसेस वितरित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, सिडको बसस्थानकाला सर्वाधिक १० बसेस मिळाल्या आहेत. त्याखालोखाल पैठण आगारालाही १० बस मिळाल्या. मध्यवर्ती बसस्थानकाला ५, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि कन्नड यांना प्रत्येकी ५ बस मिळाल्या आहेत. मात्र, सोयगाव आगाराला अद्याप एकही बस मिळालेली नाही.

या ४५ बससह काही दिवसांपूर्वी सिडको बसस्थानकाला २९ ई-बस देखील मिळाल्या असून, हरित उर्जेचा वापर वाढवण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी माहिती दिली की, आणखी ४५ नवीन लालपरी लवकरच विभागात दाखल होणार आहेत.

या नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह प्रवासाचा दर्जाही उंचावणार आहे. एकूणच, एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीला नवसंजीवनी मिळाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

498 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क