छत्रपती संभाजी नगर: मैत्रिणीसोबत फिरण्याच्या कारणावरून एका तरुणाने अन्य साथीदारांच्या मदतीने दोन तरुणांवर हल्ला केला. या घटनेत ऋत्विक जितेंद्र कुलकर्णी (वय २३, रा. सिल्कमिल कॉलनी) याच्या पोटात तब्बल १२ इंच खोल चाकू वार करून त्याच्या जीवावर बेतणारा हल्ला झाला.
काय घडले नेमके?
प्रणव हंडोरे नावाच्या तरुणाने बुधवारी अमेय खोत या तरुणाला दशमेशनगरमध्ये एका मुलीसोबत फिरताना पाहिले. ही बाब प्रणवला सहन न झाल्याने त्याने अमेयला गुरुवारी दशमेशनगरमध्ये भेटायला बोलावले. सायंकाळी ५ वाजता प्रणव ५ ते ६ साथीदारांना घेऊन घटनास्थळी पोहोचला. अमेयसोबत त्याचा मित्र ऋत्विकही होता, तर वादाचा विषय असलेली तरुणी देखील तिथे उपस्थित होती.
प्रणव आणि अमेय यांच्यात वाद झाला, जो नंतर हातघाईवर आला. प्रणव आणि त्याच्या साथीदारांनी अमेयवर हल्ला केला. हा प्रकार पाहून ऋत्विकने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी मनू काथार नावाच्या तरुणाने चाकूने ऋत्विकवर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर आणि गालावर वार करत, शेवटी पोटात तब्बल १२ इंच खोल वार केला.
घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर मनू आणि प्रणव पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पुंडलिकनगर येथे अटक केली.
आरोपींवर गुन्हा दाखल
रात्री उशिरापर्यंत प्रणव, मनू आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच, या प्रकरणी वादात असलेल्या तरुणीचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LJKkgCKh4n33MLqeQ0zqD2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*