तांत्रिक कारणांमुळे २ ते ५ ऑगस्ट दरम्यान नांदेड आणि तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने नांदेड-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-तिरुपती रेल्वे २ ऑगस्ट रोजी रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे तिरुपती-छत्रपती संभाजीनगर रेल्वे ३ ऑगस्ट रोजी आणि छत्रपती संभाजीनगर-नांदेड रेल्वे ५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

रुळांच्या देखभाल कामांमुळे नांदेड ते मनमाड डेमू अंशत: रद्द करण्यात आली आहे. रोलिंग कोरिडोर ब्लॉकमुळे ही डेमू सेवा ३१ ऑगस्टपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान रद्द राहील. या कालावधीत डेमू पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड दरम्यान धावेल. मनमाड ते नांदेड डेमू देखील पूर्णा ते नांदेड दरम्यान रद्द राहील, परंतु ही रेल्वे मनमाड ते पूर्णा दरम्यान नियमित चालू राहील.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kqy4OPp3LZSAiLoBGmRmIl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

775 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क