सिल्लोड येथे महिला मेळाव्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

शिंदे म्हणाले, “घरी बसून सरकार चालविता येत नाही. लोकांच्या सुखदुःखात सामील व्हावे लागते. ‘याला संपवेन, त्याला संपवेन,’ अशी भाषा महाराष्ट्राने कधी ऐकली नाही.” त्यांनी सूडाच्या राजकारणाचा निषेध करताना, महाराष्ट्राने अशा प्रकारच्या राजकारणाला सहन न करण्याचा इशारा दिला.

शिंदे यांनी आपल्या भाषणात त्यांच्या साधारण कुटुंबातील पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, “मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. गरीब, कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे.” या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा उल्लेख करून, शिंदे यांनी आगामी काळात राजकारणात अनेक घडामोडी होण्याची सूचना दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी  खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

482 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क