राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी आज (२८ जून २०२५) जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने ही यादी दोन दिवस आधीच प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपवली आहे. यापूर्वी ही यादी ३० जून रोजी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
यंदा राज्यभरातून १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले आहे, त्यांनी १ जुलै ते ७ जुलै २०२५ या कालावधीत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
शिक्षण संचालनालयाने यंदा प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि वेळेत पार पाडण्यासाठी प्रणालीत काही सुधारणा केल्या असून, त्यामुळे यादी वेळेत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश प्रक्रियेची पूर्तता करून आपला शैक्षणिक प्रवास वेळेवर सुरू करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*