राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे मार्फत जेईई (JEE) आणि नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी निःशुल्क अनिवासी ऑफलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण खासगी व नामांकित संस्थांमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या सात ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमाचा लाभ २०२५ मध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या आणि मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींमधील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे, तसेच त्यांच्या १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी २०२५ ते मे २०२७ असा असणार आहे.

या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२५ आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://cpetp.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षणामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास भागातील विद्यार्थ्यांना जेईई व नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

725 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क