छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत काल २९ जून रोजी चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नर दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. एकूण ६४५ अतिक्रमणे – पक्की व कच्ची बांधकामे जसे हॉटेल, लॉज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज, वॉशिंग सेंटर, कमान व जाहिरात फलक इत्यादी जमीनदोस्त करण्यात आले.

या कारवाईत मनपाचे ३५० अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस विभागाचे ४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. २० जेसीबी, ५ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ४ हायड्रॉलिक इलेक्ट्रिक वाहने अशा यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.

कारवाईवेळी नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गर्जे, यांत्रिकी विभागाचे अमोल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, जालना रोडवर परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या महाकाय होर्डिंगप्रकरणी दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

संतोष वाहुळे यांनी सांगितले की, ही मोहीम सातत्याने राबवली जाणार असून आज सोमवार, ३० जून रोजी पैठण रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,403 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क