छत्रपती संभाजीनगर :  शहरातील रस्ते रुंदीकरण मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, सोमवारी महापालिकेने आपले पथक दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटदरम्यान वळवले आहे. आज सकाळी ९ वाजेपासून या भागातील ३० मीटर रस्त्याच्या आराखड्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे सुमारे ४०० ते ४५० मालमत्ता बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्ली गेट, हिमायत बाग, मौलाना आझाद महाविद्यालय परिसर, हडको कॉर्नर परिसरात अतिक्रमण हटवण्याचे काम होणार असून, रविवारी काही मालमत्ताधारकांनी स्वखुशीने आपले साहित्य व बांधकाम हटवले. नागरिकांमध्ये या कारवाईबाबत भीतीचे वातावरण असून, महापालिकेच्या इतिहासातील ही एक मोठी मोहीम मानली जात आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होत असून, नियोजनपूर्वक पद्धतीने मोहीम राबवली जात आहे.

या मोहिमेसाठी महापालिकेने पाच पथकांची नियुक्ती केली असून, प्रत्येक पथक सुमारे ५०० मीटर अंतरात काम करणार आहे. यांत्रिकी विभागाकडून १५ जेसीबी, ४ पोकलेन, १ लॉगरिच पोकलेन, १५ टिप्पर, २ अग्निशमन बंब, २ अॅम्ब्युलन्स, २ हायड्रोलिक लेंडर आणि २ कोंडवाडा पथकांची वाहने तैनात करण्यात आली आहेत. पोलीस बंदोबस्त देखील पुरवण्यात आला आहे.

हर्सूल टी पॉइंट ते वसंतराव नाईक चौकदरम्यानच्या जळगाव रोडवर एकाच बाजूने सर्व्हिस रोड आहे, तर दुसऱ्या बाजूला नाही. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच भागात काही कंपन्यांनी जागा न दिल्यामुळे ही मोहीम पूर्वी थांबली होती. मात्र उद्या होणाऱ्या कारवाईनंतर हा रस्ता पूर्ण मोकळा होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,391 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क