छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने २ ते ११ जुलै या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातून जादा बस सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे एसटी महामंडळाला तब्बल २ कोटी ५९ लाख ३३ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५ लाख ३९ हजार ८१८ रुपयांनी अधिक आहे, हे विशेष.

या दहा दिवसांत विभागातून एकूण १७३ जादा बस सोडण्यात आल्या, ज्यांनी १,११६ फेऱ्या करत सुमारे ३ लाख ८२ हजार ७४५ किलोमीटरचे अंतर पार केले. पंढरपूर वारीसाठी एकूण ४४ हजार ९४४ भाविकांनी या बस सेवेचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी एसटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वारीत सहभागी झालेल्या भाविकांमध्ये वयोवृद्धांची संख्या लक्षणीय होती. ‘अमृत ज्येष्ठ’ योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील सुमारे १२ हजार ९१७ ज्येष्ठ भाविकांनी या सेवाचा लाभ घेतला. तसेच ६५ वर्षांवरील ९ हजार २७४ ज्येष्ठ नागरिक व १० हजार ५२२ महिला भाविकांनीही जादा बस सेवा वापरली.

यामध्ये पूर्ण तिकीट काढून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या ११ हजार २८४ तर अर्धे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या ९४७ होती. या यशस्वी बससेवेने एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ तर झालीच, पण भाविकांनाही सुरक्षित आणि आरामदायक प्रवास मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. विठूरायाच्या कृपेने एसटीला यंदा भरघोस ‘वारी’चा लाभ झाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

751 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क