छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल परिसरात महापालिकेने आजपासून (मंगळवार, दि.१५) अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा पहिला टप्पा म्हणून रस्त्याचे मार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना स्वतःहून अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रविवारी (दि.१३) हर्सूल आणि सावंगी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत आधी रस्त्यांचे मोजमाप व मार्किंग करण्यात येईल आणि नंतरच अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

त्या पार्श्वभूमीवर आजपासून महापालिकेच्या पथकाने हर्मूल रोडवरील समृद्धी पेट्रोल पंपापर्यंत २०० मीटर रुंद रस्त्यासाठी मोजणी आणि मार्किंग करण्याचे काम हाती घेतले आहे. या मार्गावर येणारी सर्व बांधकामे अनधिकृत ठरवण्यात येणार असून त्याविरुद्ध लवकरच तोडक कारवाई होणार आहे. नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कठोर पावले उचलण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

आज सुरू होणाऱ्या या मार्किंगमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी आपल्या जागेच्या सीमारेषा समजून घेण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतली असून, कारवाईबाबत स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,203 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क