छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत हर्सूल गावात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मालमत्तांचे मार्किंग करण्यात आले. एकूण १५० मालमत्ता बाधित ठरणार असून त्यात ६५ रहिवासी, ४५ व्यावसायिक व ४० मिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे.

मंगळवारी सकाळी महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी पथक गावात दाखल झाले. रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी ३० मीटर मोजणी करण्यात आली. काही मालमत्ताधारकांनी केंद्रबिंदूपासूनचे अंतर कमी-जास्त असल्याचा आक्षेप घेतला. मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देत काम पूर्ण केले.

१३ फेब्रुवारी २०२३ रोजी याच रस्त्यासाठी महापालिकेने १०० फूट रुंदीमध्ये येणाऱ्या ९८ मोठ्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या होत्या. १९९१ व २०२५ च्या विकास आराखड्यानुसार रस्त्याची एकूण रुंदी २०० फूट असावी, असा प्रस्ताव असून, उर्वरित १०० फूट रस्ता विकसित करण्यासाठी ही दुसरी टप्प्यातील कारवाई आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ जुलै रोजी भोंग्याद्वारे पूर्वसूचना दिली होती.

त्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली. मात्र, कोणताही विशेष दिलासा मिळाला नाही. मंगळवारी हर्सूल टी पॉइंट ते हर्सूल पाडार तलावापर्यंत रस्त्यालगतचे मार्किंग करण्यात आले. व्यावसायिक मालमत्तांवर तात्काळ कारवाई होऊ शकते, तर निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन संरक्षण आहे.

मार्किंगनंतर काही नागरिकांनी स्वतःहून इमारती पाडण्यास सुरुवात केली असून, दिवसभर परिसरात गडबड सुरू होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,422 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क