छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सुरू केलेल्या ‘शास्ती से मुक्ती’ आणि ‘शास्ती से आजादी’ अभियानाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ही मोहिम १५ जुलैपासून सुरू झाली असून केवळ तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३ कोटी ९३ लाख रुपयांची वसुली झाली आहे.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७०० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या शहरात सुमारे ३.२५ लाख मालमत्ताधारक असून त्यांच्याकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मिळून ८१९ कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी २२९ कोटी रुपये केवळ शास्तीच्या स्वरूपात आहेत.

सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत शास्तीवर ९५ टक्के सूट देण्यात येत आहे. तर १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान ही सूट ७५ टक्के असेल. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी थकबाकीची रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे.

वॉर्ड कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वसुली विभागाचे कर्मचारी रात्री १० वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मनपाचे कर मूल्यनिर्धारक विकास नवाळे यांनी नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, मोहिमेच्या जनजागृतीसाठी महापालिकेने ‘शास्ती से आजादी’ या थीमवर रील स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना २५ हजार, १५ हजार, ८ हजार व ४ हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी रील ३१ जुलैपर्यंत Instagram वर @smartchhatrapatisambhajinagar या अकाउंटवर Collab Request पाठवून अपलोड कराव्यात.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,286 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क