छत्रपती संभाजीनगर: चितेगाव येथे १६ जुलै रोजी नॅशनल हायवेच्या कामादरम्यान १२०० मिमीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या दुरुस्तीसाठी तब्बल दोन दिवस लागल्याने सिडको-हडकोसह जुन्या शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आधीच आठ दिवसांआड पाणी मिळणाऱ्या नागरिकांना थेट अकराव्या दिवशी पाणी मिळणार आहे.

याआधी १४ जुलै रोजी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत बिघाड झाल्याने सहा तास पाणीपुरवठा ठप्प राहिला होता. त्यानंतरच्या जलवाहिनी फुटीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. महानगरपालिकेचा दावा पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचा असला, तरी वास्तवात अनेक वसाहतींना सातव्या किंवा नवव्या दिवशीच पाणी मिळते. आता या विलंबामुळे नागरिकांना आठव्या आणि काही ठिकाणी अकराव्या दिवशी पाणी मिळणार आहे.

सिडको-हडको परिसरातील लहान घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्याचे नियोजन सहा-सात दिवस पुरेल, अशा पद्धतीने केले जात असले तरी अनपेक्षित विलंबामुळे खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घ्यावे लागत असून, नागरिकांच्या नाराजीत भर पडली आहे. मनपाने जलपुरवठा व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

770 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क