भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, संविधानाच्या कलम ६७ (A) अंतर्गत हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे.
धनखड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी उपराष्ट्रपतीपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. राष्ट्रपतींनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने दिलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार मानतो.”
धनखड यांनी संसदेतील कार्यकाळाचा उल्लेख करत खासदारांकडून मिळालेल्या प्रेम, विश्वास आणि सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभव आणि दृष्टीकोनांसाठी मी सदैव ऋणी राहीन,” असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या अभूतपूर्व आर्थिक प्रगतीचा आणि जागतिक उदयाचा साक्षीदार होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद केले आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास व्यक्त केला.
जगदीप धनखड यांचा राजीनामा हा देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी घटना मानली जात असून, त्यांच्या उत्तराधिकारीची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यकाळात संसदेत केलेल्या कामगिरीसह त्यांनी राजकीय आणि संसदीय शिष्टाचार जपले असल्याचे सर्वच पातळींवर गौरवले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*