छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकास आराखड्यातील सर्व मंजूर रस्ते रुंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२२) नारेगाव मुख्य रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच सेव्हनहिल ते सुतगिरणी या ३० मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सोमवारी (दि.२१) महापालिकेच्या पथकाने ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना आवाहन केले. बुधवारपासून (दि.२३) मालमत्ताधारकांच्या कागदपत्रांची तपासणी व मार्किंगचे काम सुरू होणार आहे.

शहरातील बीड बायपास, जालना रोड, पैठण रोडसह जुन्या व नवीन विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत जून महिन्यापासून सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत ५ प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून बांधकामे पाडण्यात आली आहेत. तर बाबा पेट्रोल पंप ते दिल्ली गेट रस्त्यांवर मार्किंगची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता ३५ मीटर रुंद करण्यात येणार असून, बाधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरण मोहिमेसाठी शहरातील अनेक ठिकाणी टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी सध्या संबंधित रस्त्यांची यादी तयार केली जात असून, पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येईल. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,318 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क