छत्रपती संभाजीनगर : शहरातील मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आता डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना यापुढे कर भरण्यासाठी महापालिका कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत तासन्‌तास उभे राहण्याची गरज नाही. महापालिकेने ‘गुगल पे’, ‘फोन पे’ आणि ‘अमेझॉन पे’सोबत करार करून घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेसाठी आपल्या मोबाईलवरील संबंधित अॅप (गुगल पे, फोन पे किंवा अमेझॉन पे) उघडून ‘बिल पेमेंट्स’ या विभागात जाऊन ‘नगरपालिका कर/सेवा’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर शहरांच्या यादीतून ‘छत्रपती संभाजीनगर महापालिका’ निवडून मालमत्ता कर क्रमांक (प्रॉपर्टी टॅक्स आयडी) किंवा आवश्यक माहिती भरावी. कराची थकबाकीची रक्कम स्क्रीनवर दिसल्यानंतर ती तपासून पेमेंट केल्यावर त्वरित डिजिटल पावती मिळते, जी नोंदीसाठी वापरता येते.

या नवीन डिजिटल सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून कर भरण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि वेगवान झाली आहे. महापालिकेने सर्व नागरिकांना ही सुविधा वापरून घरबसल्या वेळेवर कर भरण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

947 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क