छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकविणाऱ्यांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘शास्ती से आजादी’ योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान एकरकमी थकित कर भरणाऱ्यांना दंडाच्या (व्याजाच्या) रकमेवर तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. योजना सुरू झाल्यापासून अवघ्या १४ दिवसांत ९,६७१ मालमत्ताधारक आणि १,७३६ नळ कनेक्शनधारकांनी थकबाकी भरून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १६ कोटी रुपये जमा केले आहेत.

महापालिकेच्या वतीने दरमहा थकबाकीदारांवर २ टक्के व्याज आकारले जाते. मात्र, कर वसुलीत गती आणण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘शास्ती से आजादी’ आणि ‘शास्ती से मुक्ती’ या दोन योजना जाहीर केल्या आहेत. योजनेमुळे झोन कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. २८ जुलैपर्यंत १४ कोटी ५८ लाखांचा मालमत्ता कर आणि १ कोटी ४१ लाखांची पाणीपट्टी वसूल झाली असून, एप्रिलपासून आजवर एकूण ६३ कोटींची वसुली झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महापालिकेला २०० कोटींच्या वसुलीचा टप्पा गाठता आला नव्हता. मात्र २०२५-२६ साठी एप्रिलपासूनच प्रशासनाने आक्रमक मोहीम सुरू केली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये आगाऊ कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात आली होती.

योजनेनंतर, १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान ‘शास्ती से मुक्ती’ योजनेअंतर्गत एकरकमी कर भरणाऱ्यांना दंडावर ७५ टक्के सूट मिळणार आहे.

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महापालिकेच्या अॅपसह गुगल पेवरूनही कर भरता येतो. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त श्रीकांत आणि उपायुक्त विकास नवाळे यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

799 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क