छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे या मार्गावर लवकरच दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या लॉटमध्ये ही गाडी सुरू केली जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दिली.

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता मिळाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी खासदार कराड यांनी रेल्वेमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी मराठवाड्यातील रेल्वे सेवा, नव्या योजना, प्रलंबित प्रकल्प आणि सुविधा वाढवण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. याच अनुषंगाने कराड यांनी छत्रपती संभाजीनगर-मुंबई दरम्यान चालणाऱ्या वंदे भारतला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाचा उल्लेख करत दुसरी गाडी सुरू करण्याची विनंती केली.

या मागणीला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या दुसऱ्या गाड्यांच्या ताफ्यात या मार्गावर निश्चितपणे दुसरी वंदे भारत सेवा देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस खासदार डॉ. शिवाजी कालगे, अॅड. उज्वल निकम, डॉ. कल्याण काळे, बलवंत वानखेडे आणि अॅड. अतुल कराड उपस्थित होते.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयासोबत झालेल्या चर्चेतील सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती खासदार कराड हे रविवारी पत्रकार परिषदेत देणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,386 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क