आजचे राशीभविष्य 3 ऑगस्ट 2025 :
♈ मेष (Aries) : आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. तुमच्या जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल आणि त्यांच्या प्रगतीचा अभिमान वाटेल. घरगुती गोष्टींमध्ये लक्ष लागेल, नवे निर्णय घ्यावे लागतील. आरोग्य चांगले राहील पण मानसिक थकवा जाणवू शकतो.
♉ वृषभ (Taurus) : आज आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजनपूर्वक खर्च करा. कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात, संयम राखा. कामाचे ठिकाणी तुमची मेहनत नजरेत येईल.
♊ मिथुन (Gemini) : व्यवसायिक प्रगतीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखादी योजना यशस्वी ठरेल व आर्थिक लाभही होईल. मैत्रीचा आधार लाभेल, सहकारी मदत करतील. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो.
♋ कर्क (Cancer) : विरोधकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा. निर्णय घेताना फसवणूक टाळावी लागेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, पण समाधान लाभेल. आज मानसिक स्थैर्य राखणे अत्यावश्यक आहे.
♌ सिंह (Leo) : आज तुम्हाला डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवू शकतो. प्रवास लाभदायक ठरेल, विशेषतः आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाची कामं मार्गी लागतील. नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
♍ कन्या (Virgo) : आज चिंता अधिक वाटेल, परंतु ती टाळण्यासाठी ध्यान किंवा मनःशांतीचे उपाय उपयुक्त ठरतील. नोकरीत काही चांगल्या संधी मिळू शकतात. जुने प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबीयांसोबत संवाद साधताना संयम ठेवा.
♎ तुळ (Libra) : शत्रूंच्या कारवायांमुळे थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आज मन शांत नसेल, तरी मित्रांचा आधार मिळेल. करिअरमध्ये फार मोठे निर्णय आज टाळावेत.
♏ वृश्चिक (Scorpio) : कामात अडथळे येतील, त्यामुळे संयम राखा. एखादी फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे व्यवहार करताना सतर्क राहा. भावनिक अस्थिरता जाणवेल, त्यामुळे स्वःताच्या निर्णयावर विश्वास ठेवा. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
♐ धनु (Sagittarius) : पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे, आहारावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी व्यस्तता वाढेल, पण यश नक्की मिळेल. कुटुंबाकडून अपेक्षित साथ मिळेल.
♑ मकर (Capricorn) : आज मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, मन शांत ठेवणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. जुनी अडचण दूर होईल आणि मनात सकारात्मकता निर्माण होईल.
♒ कुंभ (Aquarius) : मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होईल. आज गरजेच्या कामांकडे पूर्ण लक्ष द्या, छोट्या गोष्टींमुळे यश मिळू शकते. घरात काही गोड घडामोड घडण्याची शक्यता आहे.
♓ मीन (Pisces) : गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल नाही, फसवणुकीची शक्यता आहे. मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून मदत मिळेल. तुमच्या संयमाचा कस लागेल, पण दिवसाचा शेवट समाधानकारक होईल. प्रवास शक्य असल्यास टाळावा.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*