मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार असून, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या अधिकृत एक्स (Twitter) हँडलवरून याची माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी नमूद केले की, “मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थींना जुलै महिन्याचा ₹१५०० चा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिला जाईल.”

ही रक्कम रक्षाबंधनाच्या दिवशी नव्हे, तर त्याच्या एक दिवस आधीच (८ ऑगस्ट २०२५ रोजी) महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी स्पष्टता त्यांनी केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे.

या योजनेतून राज्यातील लाखो महिलांना दरमहिना ₹१५०० आर्थिक मदत मिळते. याअंतर्गत सरकारने अपात्र लाभार्थ्यांविरोधात तपासणीही सुरु केली आहे आणि केवळ पात्र महिलांनाच हप्ता दिला जातो.

दरम्यान, अनेकांना अपेक्षा होती की जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला जाईल. मात्र, सरकारने सध्या केवळ जुलै महिन्याचा हप्ता देण्याचीच घोषणा केली आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नंतरच्या टप्प्यात दिला जाईल, अशी शक्यता आहे.

या घोषणेमुळे लाखो लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून ‘गिफ्ट’ मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,246 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क