छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई आज पार पडली. भवानी चौक ते कचरा डेपो या ३० मीटर रुंद रस्त्यावर झालेल्या या कारवाईत एकूण ८१ पक्की व कच्ची बांधकामे, ज्यामध्ये हॉटेल, दुकाने, शेड, कंपाऊंड, गॅरेज, फलक, साईन बोर्ड आदींचा समावेश होता, ती निष्कासित करण्यात आली.

या कारवाईत मनपाच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ३५० मनपा अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. त्यांना सहाय्य करण्यासाठी २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कारवाईसाठी १५ जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब तसेच ५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने यासह विविध यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.

कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त प्रशांत स्वामी, सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इमारत निरीक्षक, नगररचना विभाग व नागरी मित्र पथकानेही सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, कारवाई सुरू असताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पोलीस बळाला आवश्यक सूचना दिल्या व नागरिकांशी संवाद साधून रस्ता रुंदीकरण मोहिमेसाठी सहकार्याचे आवाहन केले. या भेटीमुळे मनपा आणि पोलीस पथकांचे मनोबल वाढल्याचे दिसून आले.

महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत नारेगाव परिसरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, पुढील काही दिवसांत उर्वरित अतिक्रमणांवरही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,652 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क