मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार असून, पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, राज्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि पोलीस दलाची ताकद वाढवण्यासाठी ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह विभाग लवकरच भरतीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. राज्यभरातील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, लेखी परीक्षा व शारीरिक चाचण्यांद्वारे भरती केली जाणार आहे.

इतर तीन महत्त्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने राज्यातील रास्त भाव दुकानदारांचा मार्जिन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्याचा लाभ अनेक लाभार्थ्यांना होणार आहे.

तसेच, सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई प्रवासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, या मार्गावरील हवाई संपर्क वाढण्यास मदत होईल.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही १५ हजार पोलिसांची भरती महत्त्वाची ठरणार आहे. आगामी काळात भरतीसंबंधी जाहिरात व वेळापत्रक जाहीर होताच उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात जाईल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,099 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क