छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वाहनधारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे. १ डिसेंबर २०२५ पासून HSRP न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट कारवाई केली जाणार आहे.

आरटीओच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांवर अद्याप HSRP बसविण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ही चौथी आणि अंतिम मुदतवाढ असणार आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी सुरुवातीला ३१ मार्च २०२५ ही अंतिम तारीख होती. मात्र, फिटमेन्ट केंद्र उघडण्यास झालेला विलंब, काही केंद्रे बंद पडणे, ग्रामीण भागातील अडचणी आणि मोठ्या प्रमाणातील मागणी यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.

1 नोव्हेंबर नंतर HSRP साठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र, अंतिम मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच HSRP नसलेल्या वाहनांच्या पुनर्नोंदणी, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण यांसारख्या सेवांवरही बंदी येणार आहे. वाहन तपासणीदरम्यान HSRP नसलेल्या वाहनांना तात्काळ थांबवून सोडण्यात येणार नाही.

परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस मालक संघटनांची बैठक घेऊन माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी तक्रारींसाठी [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,566 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क