छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय आणि कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालय यांच्यात प्राण्यांची देवाणघेवाण होणार आहे. या देवाणघेवाणीत सिद्धार्थ उद्यानातील वाघ कर्नाटकला दिले जाणार असून, त्याबदल्यात छत्रपती संभाजीनगरला सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी मिळणार आहे.

या प्रक्रियेसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दोन्ही प्राणिसंग्रहालयांकडून पाहणीची प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे पथक सिद्धार्थ उद्यानात येऊन वाघांची पाहणी करून गेले. त्यांनी बेंगॉल टायगर आणि पांढरा वाघ पाहून समाधान व्यक्त केले. हे वाघ सदृढ असून उत्तम स्थितीत असल्याचे कौतुकही त्यांनी केले.

आता १८ आणि १९ ऑगस्ट रोजी महापालिकेचे पथक कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला भेट देणार आहे. तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी तपासून पाहणार आहे. महापालिकेच्या पथकाला प्राणी योग्य वाटल्यास, ऑगस्टअखेर प्राण्यांची देवाणघेवाण पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या पथकात मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी शेख शाहेद, संजय नंदन यांच्यासह कर्मचारी सहभागी होणार आहेत. देवाणघेवाणीपूर्वी आरोग्य तपासणीसह आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या देवाणघेवाणीनंतर सिद्धार्थ उद्यानात सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांच्या समावेशामुळे प्रेक्षकांना नवीन आकर्षण उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे, शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला बेंगॉल टायगर आणि पांढरे वाघ मिळाल्याने तेथील वाघांचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. दोन्ही प्राणिसंग्रहालयांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार असून, प्राणीसंवर्धनातही तो उपयुक्त ठरेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

970 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क