छत्रपती संभाजीनगर :  शहरात आज मंगळवारी (दि. १९) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून सायंकाळी पाच वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते थेट फारोळा येथे रवाना होतील. येथे शहराच्या २६ एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सायंकाळी ५.४० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार असून नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावाही घेतला जाईल.

यानंतर सायंकाळी ७.३० वाजता एमआयटीच्या मंथन हॉलमध्ये होणाऱ्या ‘वारसा सह्याद्रीचा’ या कार्यक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री हजर राहतील. या कार्यक्रमानंतर रात्री ८.५५ वाजता ते मुंबईकडे रवाना होतील. या दौऱ्यामुळे शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून विविध भागात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, याच आजच छत्रपती संभाजीनगर टीव्ही सेंटर भागात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी विशेष वाहतूक बदल केले आहेत. १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत वाहतूक प्रतिबंध लागू राहणार असून काही महत्त्वाचे रस्ते बंद केले जाणार आहेत.

बंद असलेले मार्ग :

आयपी मेस चौक ते टीव्ही सेंटर, टीव्ही सेंटर ते एन १२ गणपती विसर्जन विहिर आणि एन १२ गणपती विसर्जन विहिर ते टीव्ही सेंटर हे प्रमुख चार मार्ग या कालावधीत बंद राहतील.

पर्यायी मार्ग :

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. बळीराम पाटील शाळा-आंबेडकर चौक-शरद टी मार्गे जाणे व येणे तसेच एन १२ गणपती विसर्जन विहिर-टी सत्यविष्णू हॉस्पिटल-अण्णाभाऊ साठे चौक या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासह कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी वाहतूक बदलांचे पालन करावे, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,137 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क