अँड्रॉइड मोबाईल युजर्ससाठी एक मोठी अपडेट आली आहे, ज्यामुळे अनेक जण चांगलेच गोंधळले आहेत. गुगलने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय फोन कॉलिंग ॲपचे डिझाइन पूर्णपणे बदलले आहे. हा बदल Material 3 Expressive Redesign चा एक भाग असून, अँड्रॉइड 16 सह सादर करण्यात आला आहे.

नेमका काय बदल झाला आहे?
नवीन अपडेटनंतर कॉल लॉगमध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वी जसा ग्रुपिंग व्ह्यू दिसायचा, तो आता नाही. प्रत्येक कॉल वेगळ्या लिस्टमध्ये दिसतो. कॉल हिस्ट्री आणि फेव्हरेट्स एकत्र करून होम टॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच, सर्व कॉल्स गोलाकार कडा असलेल्या कार्डमध्ये दिसतात. याशिवाय, मिस्ड कॉल, स्पॅम आणि कॉन्टॅक्ट्स असे फिल्टर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कॉल शोधणे सोपे झाले आहे.

युजर्सना सर्वात जास्त धक्का बसला आहे तो इंटरफेसमध्ये झालेल्या बदलामुळे. कॉल रिसीव्ह, कट करण्याची प्रोसेस बदलली असून मोठ्या आकाराचे बटन्स त्रासदायक असल्याची तक्रार युजर्स करत आहेत. मात्र गुगलचा दावा आहे की हा बदल संशोधनावर आधारित आहे. कंपनीने १८ हजारांहून अधिक लोकांवर अभ्यास करून हे डिझाइन आणले आहे, जेणेकरून आवश्यक माहिती पटकन दिसेल.

हा बदल फक्त फोन ॲपपुरता मर्यादित नाही. लवकरच गुगल मेसेजेस, कॉन्टॅक्ट्स, जीमेल आणि फोटोजमध्येही हा नवा लुक दिसेल.

नवीन डिझाइन आवडत नाही? मग काय कराल?
जर हे नवे डिझाइन नको असेल, तर तुम्ही अपडेट अनइन्स्टॉल करून जुना इंटरफेस परत मिळवू शकता. त्यासाठी:

  1. फोन ॲपवर लाँग प्रेस करा
  2. App Info वर क्लिक करा
  3. वरती असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून Uninstall Update निवडा

या सोप्या स्टेप्समुळे तुमचा डायलपॅड पुन्हा आधीसारखा होईल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805* 

1,873 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क