छत्रपती संभाजीनगर : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.

यंदा म्हाडाच्या १३४१ सदनिकांसाठी जाहिरात जून २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. नक्षत्रवाडी, अंबाजोगाई, चिकलठाणा, सातारा आणि देवळाई या परिसरातील विविध गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. सुरुवातीला निश्चित केलेल्या मुदतीनंतर अर्जदारांची सोय लक्षात घेऊन म्हाडाने आठ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे.

नवीन मुदतीनुसार अर्जदारांना ८ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तसेच अर्जासोबत अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या जाहिरातीअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची सोडत १ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे काढण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://housing.mhada.gov.in किंवा https://www.mhada.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचणी आल्यास ०२२-६९४६८१०० (नोंदणीसाठी), १८००८९१८२९७ आणि ७०६६०४७२२२ (ऑनलाईन पेमेंटसाठी) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच तांत्रिक समस्यांसाठी [email protected] या ई-मेलवरही संपर्क साधता येईल.

याशिवाय अर्जदारांच्या सोयीसाठी म्हाडा मंडळाच्या विभागीय कार्यालयात (गृहनिर्माण भवन, सीबीएस रोड, महावीर स्तंभाजवळ, तळमजला, छत्रपती संभाजीनगर) येथे विशेष मदत कक्ष उभारण्यात आला आहे. इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून सोडतीत आपले नशीब आजमावण्याची संधी गमावू नये, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,168 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क