छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथे सुरू असलेल्या हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर-जरी बक्ष यांच्या ७३९ व्या उरुसानिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या उरुसामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस विभागाकडून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड-वेरुळ-खुलताबाद-दौलताबाद-छत्रपती संभाजीनगर या मार्गाने जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. आता कन्नडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक कन्नड – कसाबखेडा फाटा – वरझडी – माळीवाडा – शरणापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगर या मार्गाने जाईल.

तसेच छत्रपती संभाजीनगरकडून कन्नडकडे जाणाऱ्या वाहनांना छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखेडा फाटा – वेरुळमार्गे कन्नड या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.

फुलंब्री-सुलतानपूर-कन्नड दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही बदल करण्यात आले आहेत. या वाहनांना फुलंब्रीवरून छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – वरझडी – कसाबखेडा फाटा – वेरुळमार्गे कन्नड या मार्गाने जाणे बंधनकारक राहील.

उरुस काळात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून हे बदल तात्पुरते असून उरुस संपेपर्यंतच लागू राहतील. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

985 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क