छत्रपती संभाजीनगर : शहरात अनंत चतुर्दशीच्या (दि. ६ सप्टेंबर २०२५) निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे विविध भागांमधून निघणाऱ्या मिरवणुका मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असून, या मिरवणुकांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे गर्दी, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ व सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी वाहतूक नियमनासाठी अधिसूचना जारी केली आहे.
📌 वाहतुकीस बंद असलेले मार्ग (सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत):
१) संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.
२) संस्थान गणपती ते शहागंज चमन मार्गे भडकलगेट.
३) जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.
४) निजामोद्दीन दर्गा रोड ते शहागंज चमन.
५) भूरे पहलवान घर ते शहागंज चमन.
६) चेलीपुरा चौक, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
७) लोटा कारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
८) कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, पैठणगेट.
९) सिटीचौक पोलीस स्टेशनजवळील गल्ली.
१०) बुढीलाईन, जुना तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
११) सिल्लेखाना चौक, पैठणगेट, रंगार गल्ली, सिटीचौक.
१२) सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा.
१३) अंजली टॉकीज ते बाबुराव काळे चौक.
१४) रॉक्सी कॉर्नर ते बाबुराव काळे चौक.
📌 सिडको-हडको परिसरातील बंद मार्ग:
१) चिश्तिया चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल, जिजाऊ चौक ते शरद टी.
२) चांदणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटर.
३) एन-१ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल नाका.
४) आझाद चौक ते बजरंग चौक.
५) सेव्हनहिल, त्रिमूर्ती चौक, पटीयाला बँक ते गजानन महाराज मंदिर.
📌 पर्यायी मार्ग:
- रोशनगेटकडून शहागंजकडे जाणारी वाहने चेलीपुरा चौक, लोटा कारंजा मार्गे वळवली जातील.
- मिलकॉर्नरकडून औरंगपुरा व खडकेश्वरकडे जाणारी वाहने अंजली टॉकीज, नागेश्वरवाडी मार्गे जातील.
- क्रांती चौकाकडून येणारी वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर मार्गे नेण्यात येतील.
- सिडको-हडको परिसरातील वाहतूक विविध पर्यायी रस्त्यांवर वळवण्यात येणार आहे.
या नियमानुसार, केवळ पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक व गणेश विसर्जनाशी संबंधित अत्यावश्यक वाहनांनाच परवानगी असेल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा व इतर फौजदारी कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे.
👉 नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*