मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली असून यासाठी तब्बल ३४४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली.

मंत्री तटकरे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे.” तसेच “महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,” असेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या योजनेसाठी राज्यभरात सुमारे २ कोटी ४८ लाख महिला लाभार्थी आहेत. यामधून लाखो महिलांचे अर्ज निकषाबाहेर असल्याने बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी पात्रतेच्या अटींच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या अर्जावर कारवाई करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून हप्त्याचा निधी जमा न झाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र सरकारने हप्ता वर्ग करून प्रक्रिया सुरू केल्यामुळे आता लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असून, निधी वितरणाने महिलांच्या अपेक्षांना दिलासा मिळाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,745 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क