मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय घेऊन येणारे निर्माते- दिग्दर्शक प्रेक्षकांना नव्या चित्रपटांची मेजवानी देत आहेत. त्यात ‘फॅन्ड्री’ फेम राजेश्वरी खरात , राहूल दराडे व सोमनाथ अवघडे (जब्या) यांसारख्या तरुण कलाकारांचा सहभाग असलेला ‘कलवरी’ हा आगामी चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील गीते नुकतीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाली असून त्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘कलवरी’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटातील तीन गाणी – मखमली, सांग तुझ्या मागं आणि रंग हळदीला – प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. k-minesmusic चॅनलवर ही गीते उपलब्ध असून सोशल मीडियावर त्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ओंकारस्वरूप, जसराज जोशी, शाहीर रामानंद ऊगले आणि सौमी शैल्श या लोकप्रिय गायकांनी या गाण्यांना आपला मधुर आवाज दिला आहे, तर संगीताची जबाबदारी श्री बबन अडागळे आणि पी. शंकरम यांनी सांभाळली आहे.
निर्माते- विकास कुटे (छत्रपती संभाजीनगर), रोहित बेलदरे आणि राणी टोणगे हे आहेत तर दिग्दर्शनाची जबाबदारी प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी पार पाडली आहे. यांनी या आगोदर ॲटमगिरी तिरसाट चिञपटाचे दिग्दर्शन केले आहे
चित्रपटात अंकिता राऊत, सुजित चौरे आणि सिध्देश्वर झाडबुके असे पन्नास हून जास्त कलाकार असून त्यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.
सोनगिरी (ता. भूम, जि. धाराशीव) आणि पिंपळगाव कौडा (जि. अहिल्यानगर) येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन आणि मनोरंजन करणार यात शंका नाही अशी निर्माते विकास कुटे यांनी सांगितले.
२४ ऑक्टोबरपासून ‘कलवरी’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आकर्षक कथा, दर्जेदार संगीत आणि धडाकेबाज दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे ‘कलवरी’ बद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.