छत्रपती संभाजीनगर: शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जाफरगेट येथील जुना मोंढा परिसरात राहणाऱ्या शेख अरमान या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अरमान हा घराजवळ खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर पालकांनी अरमानची तपासणी केली, परंतु कुठेही जखम दिसली नाही. प्रत्यक्षात कुत्र्याने त्याच्या डोक्यात चावा घेतला होता, परंतु केसांमुळे ती जखम पालकांच्या लक्षात आली नाही. काही दिवसांनी अरमानची तब्येत खालावू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता डोक्यातील चावा लक्षात आला, मात्र उपचारादरम्यान अरमानचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. तीन वर्षांच्या निष्पाप जीवाचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बळी गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी महापालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी मोहिम राबवावी, तसेच शहरात फिरणाऱ्या कुत्र्यांचे निर्बंधन, लसीकरण आणि निवारा केंद्र उभारणीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,851 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क