छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणात शहर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सोमवार २० ते २७ ऑक्टोबरदरम्यान तब्बल ३२०० सफाई कर्मचारी सुट्टी न घेता शहरातील स्वच्छतेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणार आहेत. दिवाळीच्या काळात कचऱ्याचे प्रमाण सुमारे ५ टक्क्यांनी वाढत असल्याने मनपाकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. 

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिवाळीपूर्वीच घनकचरा आणि यांत्रिकी विभागाला स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपायुक्त नंदकिशोर भोंबे आणि यांत्रिकी विभागाचे अमोल कुलकर्णी यांनी नियोजन आखले आहे. दिवाळीपूर्वी घरांची रंगरंगोटी आणि साफसफाईमुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. हा कचरा उघड्यावर पडू नये म्हणून सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील बाजारपेठांमधील वाढत्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी स्वतंत्र ५० घंटागाड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रमुख रस्त्यांवरील धूळ आणि माती स्वॅपिंग मशीनच्या साहाय्याने गोळा केली जात आहे. प्रत्येक वॉर्डात सकाळी पहाटे ५ वाजल्यापासून स्वच्छतेचे काम सुरू केले जाते.

घनकचरा विभाग, यांत्रिकी शाखा, तसेच रेड्डी कंपनी आणि बचत गटांमार्फत नियुक्त सफाई कर्मचारी मिळून ३२०० कर्मचाऱ्यांची मोठी फौज दिवाळीच्या काळात शहर स्वच्छतेसाठी झटत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या कर्मचाऱ्यांची दिवाळी रस्त्यावरच साजरी होणार आहे. मनपातर्फे या कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून त्यांचे मनोबल वाढवले जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

277 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क