छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र शनिवारी पहाटे फारोळा परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. धनत्रयोदशीच्या दिवशीच ही घटना घडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

फारोळा येथे पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने जायकवाडी येथून येणारा पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता सुभाष लोहाडे, आशिष वाणी यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. कंत्राटदाराच्या कामगारांच्या मदतीने फुटलेल्या ठिकाणी साचलेले पाणी मोटारींच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.

या दुर्घटनेमुळे काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिला तर काही भागात कमी दाबाने पाणी आले. विशेषतः दिवाळीच्या खरेदी आणि सणाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर अनेक भागातील नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. तथापि, मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १२०० आणि ९०० मिमी व्यासाच्या इतर जलवाहिन्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहिले असून, जलवाहिनीचे जीर्ण स्वरूप लक्षात घेता अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

507 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क