छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील १५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
तत्कालिन गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या बदलीनंतर हे पद काही दिवसांपासून रिक्त होते. या पदासाठी अनेक अधिकाऱ्यांनी मुंबईपर्यंत प्रयत्न केले असल्याचे बोलले जात होते. अखेर शुक्रवारी (दि. १८ ऑक्टोबर) आयुक्त पवार यांनी बदली आदेश जारी करत शहरातील अनेक महत्त्वाच्या ठाण्यांचा कार्यभार बदलला.
गजानन कल्याणकर यांची एमआयडीसी सिडको येथून गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर गीता बागवडे यांना अमली पदार्थ प्रतिबंधक विभागातून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात, शिवचरण पांढरे यांना सायबर ठाण्यातून वाळुज ठाण्यात, अतुल येरमे यांना उस्मानपुरा येथून सिडको ठाण्यात, तर सोमनाथ जाधव यांना नियंत्रण कक्षातून सायबर ठाण्यात बदली देण्यात आली आहे.
याशिवाय सुनिता मिसाळ यांना हर्सुलवरून भरोसा सेलमध्ये, स्वाती केदार यांना विशेष शाखेतून हर्सुल ठाण्यात, तर राजेंद्र सहाणे यांना वाळुजवरून पोलिस आयुक्त यांचे वाचक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुय्यम निरीक्षक व नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे सिडको वाहतूक शाखेचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. तसेच जवाहरनगरचे सचिन कुंभार व जिन्सीचे शिवाजी बुधवंत यांना त्याच ठाण्यांवर कायमस्वरूपी प्रभारीपद देण्यात आले आहे. या बदलींमुळे शहर पोलिस दलात नव्या जबाबदाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*