छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वेस्थानकाचे रूपांतर आता आधुनिक स्वरूपात होत आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत तब्बल २४१.२७ कोटी रुपयांच्या खर्चाने हे काम सुरू असून, हे स्थानक विमानतळाच्या धर्तीवर तयार केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की हे स्थानक विदेशातील स्टेशनपेक्षाही आधुनिक आणि सुविधायुक्त असेल.

या कामाची मुदत एप्रिल २०२६ पर्यंतची असून, सध्या बांधकाम वेगाने सुरू आहे. नव्या इमारतीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने नियोजित मुदतीत काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या सध्याच्या रेल्वे स्थानकाच्या जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले असून, प्रवाशांसाठी पर्यायी प्रवेशद्वार आणि मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मालधक्का परिसरातील नवीन इमारतीचे कामही वेगाने सुरू आहे.

या नूतनीकरण प्रकल्पात ‘रूफ प्लाझा’ ही अनोखी सुविधा देण्यात येणार आहे. रेल्वे रुळांवर छतासारखी रचना करण्यात येणार असून, त्यावर फूड कोर्ट, प्रतीक्षालय, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, कॅफेटेरिया आणि किरकोळ दुकाने असतील. याशिवाय प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, डिजिटल माहिती प्रणाली आणि संपूर्ण आच्छादित फलाट देखील असतील.

स्थानकात दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येईल अशी रचना करण्यात येत आहे. विद्यमान प्रवेशद्वारासोबतच सिल्कमिलच्या बाजूने नवे प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचे रेल्वे स्थानक केवळ प्रवासाचे केंद्र राहणार नसून, ते पर्यटन आणि व्यावसायिक दृष्ट्याही महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे.

या नव्या स्टेशनच्या माध्यमातून शहराचे आधुनिकीकरणाचे आणखी एक पाऊल पुढे पडत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,474 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क