छत्रपती संभाजीनगर : “लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि जास्तीत जास्त मतदान अत्यावश्यक आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेला सक्षम करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर येथे केले. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी स्वामी यांनी रविवार, वैजापूर येथे निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी भागवत विघोत, तहसीलदार सुनिल सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक तावीजवाले आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदार जागृती, मतदान यंत्रांची तयारी, स्ट्रॉंग रुमची सुरक्षा, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था या महत्त्वाच्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

ते पुढे म्हणाले की, “महिला मतदारांचा सहभाग वाढवणे ही वेळेची गरज आहे. त्यांच्यामध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी याकडे विशेष लक्ष द्यावे.” अधिकारीांनी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्याची माहितीही बैठकीत दिली.

कार्यक्रमात शाहीर अशोक बागुल यांच्या पथकाने मतदान जनजागृतीसाठी खास तयार केलेला पोवाडा सादर केला. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘मी मतदान करणारच’ या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून मतदानाच्या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी तयारी सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी स्वामी यांच्या मार्गदर्शनामुळे वैजापूरमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निश्चितच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

358 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क