छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
नोव्हेंबरपासून थंडीने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. ९ नोव्हेंबर रोजी तापमान १२.८ अंशांवर उतरले. मात्र २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान अचानक तापमान वाढले आणि थंडीने काही दिवस माघार घेतली. त्यानंतर १ डिसेंबरपासून पुन्हा गारवा वाढू लागला आणि आता तापमानाने १० अंशांचा टप्पा गाठला आहे.
किमान तापमानाच्या घसरणीमुळे सकाळी थंड वाऱ्याचा जोर वाढला असून बाहेर पडताना उबदार कपड्यांची गरज भासते आहे. अनेक नागरिक टोपी, मफलर, जॅकेट परिधान करून बाहेर पडताना दिसत आहेत. दिवसभर हलक्या उन्हाची सोबत असली तरी सकाळ आणि सायंकाळच्या थंडीत वाढ झाली आहे.
गेल्या पंधरवड्यापासून तापमानात चढ-उतार होत असताना गेल्या आठवड्यापासून पुन्हा थंडीचा जोर वाढल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
📌 तापमानाचा मागोवा:
- २ नोव्हेंबर : २२°C
- ९ नोव्हेंबर : १२.८°C
- १९ नोव्हेंबर : १०.६°C
- ३० नोव्हेंबर : १०.२°C
- ८ डिसेंबर : १०°C
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*