छत्रपती संभाजीनगर :  महापालिकेच्या ११५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि. २) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ५५४ उमेदवारांनी माघार घेतली. सुरुवातीला १,८७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९७ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. माघारीनंतर आता ८६० उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत.

  •  झोननिहाय अर्ज माघार व वैध अर्जांची आकडेवारी समोर आली आहे.
    झोन क्रमांक १ (प्रभाग ३, ४, ५) मध्ये ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून २०२ अर्ज वैध ठरले आहेत.
    झोन क्रमांक २ (प्रभाग १५, १६, १७) मध्ये ७४ अर्ज माघार तर ६६ अर्ज वैध आहेत.
    झोन क्रमांक ३ (प्रभाग ६, २२, २३, २४) मध्ये ४२ अर्ज माघार व ९२ वैध अर्ज आहेत.
    झोन क्रमांक ४ (प्रभाग २, ३, ७) मध्ये ४० उमेदवारांनी माघार घेतली असून ९३ अर्ज वैध ठरले आहेत.
    झोन क्रमांक ५ (प्रभाग ८, ९, २०, २१) मध्ये ७३ अर्ज माघार व १०७ अर्ज वैध आहेत.
    झोन क्रमांक ६ (प्रभाग २३, २४, २५) मध्ये ५६ अर्ज माघार तर ९८ अर्ज वैध राहिले आहेत.
    झोन क्रमांक ७ (प्रभाग २२, २३, २७) मध्ये ४२ अर्ज माघार व ८४ वैध अर्ज आहेत.
    झोन क्रमांक ८ (प्रभाग २६, २८, २९) मध्ये सर्वाधिक ७२ अर्ज माघार घेण्यात आले असून १२४ अर्ज वैध ठरले आहेत.

एकूण आठही झोनमध्ये ५५४ अर्ज माघार आणि ८६० अर्ज वैध असल्याचे चार्टमधून स्पष्ट होते. दरम्यान, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ओवेसी यांच्या सभा होणार असल्याने निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

718 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क