छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने शोक व्यक्त करत आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (सामान्य प्रशासन विभाग) यांच्याकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडून प्राप्त सूचनांनुसार स्व. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या निधनामुळे राज्यात शासकीय शोक पाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच दि. २८ जानेवारी ते दि. ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत कोणतेही अधिकृत मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी हे परिपत्रक जारी केले असून, संबंधित सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना निर्देशांचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजावर आज परिणाम होणार असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,389 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क