छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. ६३ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीनंतर सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली असून, महायुतीतील पक्षांनी बहुतेक ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्षाने २४ जागा (एक पुरस्कृत उमेदवारासह) जिंकत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २२ जागांवर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. जरी भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरला असला, तरी शिंदेसेनेची कामगिरीही तितकीच प्रभावी ठरली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने लढत अधिक रंगतदार झाली. पैठण तालुक्यात तांत्रिक कारणांमुळे भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून लढले; मात्र त्यांना यश मिळाले नाही. येथे शिंदेसेनेने ९ पैकी ८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर उर्वरित एक जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळाली. सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला प्रभाव दाखवत ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवला, तर भाजपनेही तीन जागा पटकावत आपली उपस्थिती ठळक केली.
वैजापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांना कडवी झुंज द्यावी लागली. येथे शिंदेसेनेला ८ पैकी ४ जागा मिळाल्या, तर उर्वरित जागांवर भाजप आणि अन्य पक्षांनी बाजी मारली. कन्नडमध्ये मात्र भाजपने तीन जागा जिंकत आघाडी घेतली, तर उद्धवसेनेला दोन आणि शिंदेसेनेला केवळ एक जागा मिळाली. यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसून आले.
गंगापूर आणि खुलताबादमध्ये भाजपने जोरदार पुनरागमन करत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. खुलताबादमध्ये भाजपने तिन्ही जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. फुलंब्रीमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांनी तीनही जागा राखत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला. सोयगावात भाजपने दोन जागा जिंकत शिंदेसेनेला मोठा धक्का दिला, तर एक जागा उद्धवसेनेच्या वाट्याला आली.
एकूणच या निकालांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात नवी समीकरणे तयार झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी
१) लाडसावंगी – राधाकिशन पठाडे –शिवसेना (शिंदे)
२) गोलटगाव – ज्योती शिंदे – प्रहार
३) करमाड – साधना कुलकर्णी – भाजप
४) सावंगी – अजिनाथ धामणे – भाजप
५) दौलताबाद – लंकाबाई जाधव – भाजप
६) वडगाव (को.) उत्तरपूर्व–ललिता सोनवणे–उबाठा)
७) वडगाव(को.)मध्यपश्चिम सचिन गरड अपक्ष(bjp पुरस्कृत)
८) पंढरपूर – विद्या गायकवाड – शिवसेना (ठाकरे)
९) आडगाव बु. – विजय घोडके – शिवसेना (शिंदे)
१०) पिंप्री बु. – जयश्री पवार – भाजप
११) चितेगाव – कृष्णा गिधाने – शिवसेना (शिंदे)
१२) बिडकीन – मनोज पेरे – शिवसेना (ठाकरे)
१३) आडूळ बु. – रुपाली तवार – शिवसेना (शिंदे)
१४) पाचोड बु. – शिवराज भूमरे – शिवसेना (शिंदे)
१५) दावरवाडी – जयश्री वाघमोडे – शिवसेना (शिंदे)
१६) ढोरकिन – राधिका जगताप – शिवसेना (शिंदे)
१७) पिंपळवाडी – कारभारी लोहकरे – शिवसेना (शिंदे)
१८) विहामांडवा – नितीन तांबे – शिवसेना (शिंदे)
१९) नवगाव – पांडुरंग औटे – शिवसेना (शिंदे)
२०) सावंगी – संगीता अमराव – भाजप
२१) अंबेलोहळ – रतन बत्तीसे – भाजप
२२) रांजणगाव शे.पुं. – अमोल लोहकरे – भाजप
२३) वाळूज बु.–बालाजी सोनटक्के– राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)
२४) तुर्काबाद – स्वाती पाटेकर – शिवसेना (शिंदे)
२५) शिल्लेगाव – सविता जाधव – भाजप
२६) नेवरगाव – वैजयंती शिरसाठ – राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)
२७) जामगाव – दीपा मुंदडा – अपक्ष
२८) शेंदूरवादा – कृष्णा साहेबराव पाटील – शिवसेना (ठाकरे)
२९) वाकला पार्वतीबाई जाधव अपक्ष (शिवसेना शिंदे पुरस्कृत)
३०) बोरसर – कल्याण गायके – शिवसेना (ठाकरे)
३१) शिवूर – संजय निकम – शिवसेना (ठाकरे)
३२) सवंदगाव – निताताई राजपूत – शिवसेना (शिंदे)
३३) लासूरगाव – संगीता तांबे – शिवसेना (शिंदे)
३४) घायगाव – श्रीराम गायकवाड – शिवसेना (शिंदे)
३५) वांजरगाव – पंकज ठोंबरे – राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)
३६) महालगाव – अविनाश गलांडे – भाजप
३७) नागद – तृप्ती राजपूत – काँग्रेस
३८) करंजखेडा – अर्जुन पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)
३९) चिंचोली लिंबाजी – रावसाहेब पवार – शिवसेना (शिंदे)
४०) पिशोर – केतन काजे – शिवसेना (ठाकरे)
४१) कुंजखेडा – सुनंदा चव्हाण – शिवसेना (ठाकरे)
४२) हतनूर – मीनाक्षी पवार – भाजप
४३) जेहूर – मंजुषा मलदोडे – भाजप
४४) देवगाव रंगारी – डॉ. संजय गव्हाणे – भाजप
४५) बाजारसावंगी – प्रतीक्षा कापसे – भाजप
४६) गदाना – रेखा चव्हाण – भाजप
४७) वेरूळ – कुणाल दांडगे – भाजप
४८) बाबरा – जितेंद्र जयस्वाल – भाजप
४९) वडोद बाजार – गोपाळ वाघ – भाजप
५०) पाल – गीतांजली पाथ्रीकर – राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.)
५१) गणोरी – निखिल चव्हाण – भाजप
५२) अजिंठा आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन–शिवसेना (शिंदे)
५३) शिवना – निकिता काळे – शिवसेना (शिंदे)
५४) उंडणगाव – सचिन वाघ – भाजप
५५) अंभई – अब्दुल आमेर अब्दुल सत्तार – शिवसेना (शिंदे)
५६) घाटनांद्रा – आशा गाढे – शिवसेना (शिंदे)
५७) डोंगरगाव – देविदास पालोदकर – शिवसेना (शिंदे)
५८) भराडी – राधाकृष्ण काकडे – भाजप
५९) अंधारी – मंगल तायडे – शिवसेना (शिंदे)
६०) केन्हाळा – अनिता मोठे – भाजप
६१) फर्दापूर – मुलतानी माहिन इद्रिस – भाजप
६२) आमखेडा – पुष्पाबाई काळे – भाजप
६३) गोंदेगाव – सुनीता चव्हाण – शिवसेना (ठाकरे)
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*