छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात येणार असून सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत संस्थान गणपती ते क्रांती चौक, सिडको-हडको, टी.व्ही. सेंटर ते गजानन महाराज मंदिर आणि पुंडलिकनगर परिसरात मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

तसेच १८ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन जाहीर केले आहे. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार शहरात दोन दिवस वाहतुकीचे मार्ग बंद व पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत गोपाल टी पॉईंट ते सिल्लेखाना चौक तसेच क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूचे सर्व्हिस रोड पूर्णतः बंद राहतील. या काळात वाहने गोपाल टी उत्सव मंगल कार्यालय मार्गे, चुन्नीलाल पेट्रोल पंप मार्गे, सिल्लेखाना ते सावरकर चौक सतीश मोटर्स मार्गे तसेच सिल्लेखाना ते खोकडपुरा मार्गे वळवण्यात येतील. उड्डाणपुल मात्र वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत राजाबाजार चौक, संस्थान गणपती, शहागंज, सिटी चौक, गुलमंडी, पैठणगेट, सिल्लेखाना, क्रांती चौक, गोपाल टी, सिडको एन-१२, टी.व्ही. सेंटर, जिजाऊ चौक, शिवनेरी कॉलनी, जयभवानी नगर, गजानन महाराज मंदिर ते आदिनाथ चौक हे प्रमुख मार्ग बंद राहतील.

वाहनांसाठी चेलीपुरा–लोटा कारंजा–कामाक्षी लॉज, सावरकर चौक–मिल कॉर्नर–भडकल गेट, नागेश्वरवाडी–निराला बाजार–समर्थनगर, खडकेश्वर मार्ग, जालना रोड तसेच माणिक हॉस्पिटल–त्रिमूर्ती चौक हे पर्यायी मार्ग खुले ठेवण्यात आले आहेत.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,251 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क