आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2024:
1. मेष: मानसिक स्वास्थ्य मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात समाधान मिळेल.
2. वृषभ: आज आर्थिक लाभ होईल. नवीन योजनेत यश मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मोठ्या आर्थिक फायद्याची शक्यता आहे.
3. मिथुन: आरोग्याची काळजी घ्या, खर्च वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे सावधानता बाळगा.
4. कर्क: धाडसी निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल, मित्रांकडून मदत मिळेल.
5. सिंह: व्यापारात थोडा तणाव जाणवेल, परंतु आर्थिक लाभ होईल. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर दिवस असेल. काही महत्त्वाच्या संधी मिळतील.
6. कन्या: प्रयत्न यशस्वी होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांसाठी अचानक खर्च करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीतही अनुकूलता असेल.
7. तुळ: आज बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. सहकार्य लाभेल आणि तुमची लोकप्रियता वाढेल.
8. वृश्चिक: प्रॉपर्टीशी संबंधित नवीन प्रस्ताव येतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळेल.
9. धनु: हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमचे मनोबल चांगले राहील, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने काम करू शकाल.
10. मकर: आज काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
11. कुंभ: तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम संधी आणि प्रसिद्धी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, आणि मानसिक समाधान मिळेल.
12. मीन: आज काहींना आध्यात्मिकतेकडे झुकण्याची इच्छा होईल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्या.