छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल तलावात बुडून एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. सौरभ पोकळे (वय २२, मूळ रा. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८:३५ वाजण्याच्या सुमारास रवींद्रकुमार शिंदे यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला फोन करून तलावात एक तरुण बुडाल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन-९ उपकेंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तत्परतेने तलावात शोधमोहीम सुरू केली.

काही वेळाच्या प्रयत्नांनंतर जवानांना सौरभ पोकळे याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सौरभ हा अनाथ असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सौरभच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,415 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क