छत्रपती संभाजीनगर : वाळूज MIDC तून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील सततच्या वादातून त्रस्त झालेल्या २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रांजणगाव शेणपूंजी परिसरात घडली असून पवन ज्ञानेश्वर भुते असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन याचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाले होते. नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच पती-पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून सतत वाद होत होते. या वादांमुळे पवन गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता. अखेर या तणावाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ही घटना शेजारी राहणाऱ्या त्याच्या भावाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. खिडकीतून पाहिले असता पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर भावाने तात्काळ वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला असता पवनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अवघ्या सहा महिन्यांच्या संसाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत असून नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,492 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क