छत्रपती संभाजीनगर : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या एका विशेष बॅनरची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. शहरातील विविध चौकांमध्ये वाढदिवसाचे शुभेच्छा फलक झळकत असताना एका बॅनरवर “संभाजीनगरचा हिंदूयोद्धा” असा उल्लेख करण्यात आला असून त्यासोबत बुलडोझरची प्रतिमा देखील ठळकपणे दाखवण्यात आली आहे.

या बॅनरमधील ‘बुलडोझर’ या प्रतिमेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुलडोझर हे प्रतीक सध्या कठोर प्रशासन, अतिक्रमणाविरोधातील कारवाई आणि आक्रमक भूमिकेचे प्रतीक मानले जात असल्याने या बॅनरमधून ठोस संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

विशेष म्हणजे, शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमणविरोधी मोहिमा आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या बॅनरकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. समर्थकांकडून राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले जात असताना विरोधकांकडून मात्र या प्रतिमांवरून टीकाही केली जात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा या बॅनरमधील बुलडोझर प्रतिमेनेच सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,130 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क