छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शिंदे सेनेत पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पदासाठी शुभम काळे यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात आंदोलन छेडले.


 

क्रांती चौक येथे बनकर यांनी ‘जोडे मारो’ आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जंजाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारत निषेध नोंदवला. निवड प्रक्रियेत अन्याय व भेदभाव झाल्याचा आरोप करत, जंजाळ हे पदाचा गैरवापर करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच निवडीत जातीवादाचा प्रभाव असल्याचा गंभीर आरोपही बनकर यांनी केला आहे.

या आंदोलनामुळे शिंदे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता अशा प्रकारचे वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेते या प्रकरणात मध्यस्थी करतील का आणि हा वाद शांत होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या राजकारणात या घडामोडींचा पुढील काळात काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,623 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क